चिपळूणमधील वेशा व्यवसाय प्रकरणी ‘त्या’ महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Gramin Varta
476 Views

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेशा व्यवसायाप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्या महिलेला आज चिपळूण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील एका ३६ वर्षीय महिलेला यापूर्वी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, शुक्रवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिची रवानगी जिल्हा विशेष कारागृहात केली आहे.

शहरातील महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलच्या दुसऱ्या माळ्यावरील खोली क्रमांक २०२ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी ३६ वर्षीय महिलेला अटक करून सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, या कारवाईत सापडलेल्या दुसऱ्या २३ वर्षीय तरुणीला यापूर्वीच महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू ठेवला आहे.

Total Visitors :
4667330
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *