राजापूर : खापणे महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती व ग्रंथालय दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
141 Views

राजापूर / तुषार पाचलकर : तालुक्यातील श्री. मनोहर हरी खापणे महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती आणि ग्रंथालय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. एस. एस. धोंगडे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले, तर डॉ. रंगनाथन यांच्या कार्याची माहिती ग्रंथपाल डॉ. एम. आर. कोंडागुर्ले यांनी आपल्या मनोगतातून दिली. ग्रंथालय विभागासाठी डॉ. रंगनाथन यांचे कार्य अनमोल असून त्यांच्या कार्याचे व विचारांचे वारसदार आपण होऊया, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील दुर्मिळ आणि अनमोल ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन डॉ. पी. एस. मेश्राम यांच्या हस्ते झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. एस. धोंगडे यांनी केले तर आभार डॉ. एम. आर. कोंडागुर्ले यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4693489
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *