खेड :तुळशी खुर्द येथे शेतातून ४५ हजार रुपयांचा पॉवर विडर चोरीस

Gramin Varta
76 Views

खेड : तालुक्यातून एक चोरीची बातमी समोर आली आहे. खेड तालुक्यातील निंबा-याचा माळ, तुळशी खुर्द येथे शेतात ठेवलेला पावर विडर अज्ञात चोरांनी लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार दिनांक २३ जून २०२६ रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दिनांक २४ जून २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या मुदतीत घडला. फिर्यादी सुधाकर शंकर दरेकर (वय ६० वर्षे, व्यवसाय शेती, रा. तुळशी खुर्द, दरेकरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुधाकर दरेकर यांच्या शेतात ठेवलेला VKA 170F Power Weeder 7HP लाल रंगाचा पावर टेलर (शेत नांगरणी करण्याचा छोटा ट्रॅक्टर) ठरलेल्या जागी दिसून आला नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने हा पावर विडर चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीस गेलेल्या या पावर विडरची किंमत ४५ हजार रुपये इतकी आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी नोंद करण्यात आली असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) आणि ३७९ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4710860
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *