GRAMIN SEARCH BANNER

एलटीटी – मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन

मुंबई: गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.

६ गणपती विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे …

लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ६ सेवा)

01003 साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार दि. २५.०८.२०२५, ०१.०९.२०२५ आणि ०८.०९.२०२५ रोजी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

01004 साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवार दि. २४.०८.२०२५, ३१.०८.२०२५ आणि ०७.०९.२०२५ रोजी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.

संरचना : १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण : गणपती विशेष गाडी क्रमांक 01003 साठी आरक्षण ०५.०८.२०२५ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](https://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.

या विशेष गाड्यांचे थांबे व वेळांचा तपशील पाहण्यासाठी कृपया [www.enquiry.indianrail.gov.in](https://www.enquiry.indianrail.gov.in) संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

Total Visitor Counter

2456111
Share This Article