GRAMIN SEARCH BANNER

वरवडे येथे आरोग्य शिबीर संपन्न

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ च्या मत्स्य  महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री. चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी ओ), वरवडे; इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मीड टाउन; रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने  रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल, नंदादीप आय हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल, रत्नागिरी आणि जल जीविका, पुणे यांच्या सहकार्याने  वरवडे येथे सर्वाइकल, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्शन, नेत्र आणि मोती बिंदू  तपासणी, तसेच रक्त तपासणी करून मोफत आरोग्य  शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. रामनाथ हॉस्पिटल कडून ईसीजी चेक अप, ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हील हॉस्पिटल कडून  मधुमेह, सर्व्हायकल व ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, नंदादीप कडून नेत्र तपासणी  असा मल्टी डायग्नोस्टिक कॅम्प आयोजित केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि  सुमारे ७० रुग्णांनी त्याचा फायदा घेतला. याच शिबिरात सिव्हील हॉस्पिटल कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी बदल विस्तृत माहिती देण्यात आली. गांधी डीस्ट्रीब्यूटर कडून शिबिरासाठी औषधे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी इनरव्हील च्या अध्यक्षा ऋचा गांधी, सेक्रेटरी सुवर्णा चौधरी, ट्रेझरर श्रद्धा सावंत, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाऊन च्या अध्यक्षा डॉ स्वप्ना करे, बिपिनचंद्र गांधी,  रोटे. डॉ. संदीप करे, सेक्रेटरी राजेंद्र (दादा) कदम, मत्स्य महाविद्यालयाचे  प्रा. डॉ सुहास वासावे, डॉ संदेश पाटील, श्री. भालचंद्र नाईक, जल जीविका रत्नागिरीचे श्री चिन्मय दामले, रामनाथ हॉस्पिटलचे डॉ. मोहिते, सिव्हील हॉस्पिटल च्या डॉ. भायजे  आणि कर्मचारी उपस्थित होते. मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन वरवडे गावचे उपसरपंच श्री गजानन हेदवकर याच्या शुभहस्ते आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरीचे प्राचार्य डॉ केतन चौधरी, प्रमुख अन्वेषक डॉ सुहास वासावे याच्या उपस्थितीत झाले.

सदर शिबिराचे व्यवस्थापन अतिशय  उत्कृष्टपणे चंडिका देवी मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षा सौ रीना सुर्वे, उपाध्यक्षा सौ. कांचन लाकडे, माजी अध्यक्षा सौ अस्विता पटेकर, सौ. प्रज्योती पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय पटेकर, श्री. विलास पटेकर यांनी केले.

Total Visitor Counter

2650584
Share This Article