जाकादेवी/ वार्ताहर;-
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय जाकादेवी येथील स्काऊट गाईड विभागातर्फे रक्षाबंधन कार्यक्रम वृक्षांना राखी बांधून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नितीन मोरे ,पर्यवेक्षक श्री.शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख व स्काऊट मास्टर श्री.संतोष पवार, गाईड कॅप्टन सौ.सायली राजवाडकर, सौ. प्राची पवार , सहाय्यक शिक्षक अमित बोले , हेमराज बहिरम, अवधूत जाधव,कलाध्यापक प्रणित जाधव यांसह स्काऊट गाईड विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे स्काऊट विभागाच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रथम राख्या तयार केल्या होत्या. या राख्या गाईड विद्यार्थीनींनी स्काऊट विद्यार्थ्यांना बांधल्या. त्यानंतर स्काऊट गाईड विभागातर्फे शालेय परिसरातील अनेक झाडांना राख्या बांधून हा उत्सव द्विगुणीत केला.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष आपला सोबती ,झाडांचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन विद्यालयातील स्काऊट गाईड विभागातर्फे स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न केला. उपस्थित गाईड विद्यार्थीनींनी व गाईड कॅप्टन यांनी विद्यालयातील स्काऊट विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक यांना राख्या बांधून हा उत्सव साजरा केला.