दिल्ली: टीम इंडियाचे अनुभवी क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२५ च्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवू शकतात.
कारण बीसीसीआय २०२७ च्या विश्वचषकाच्या योजनांमध्ये त्यांचा समावेश करत नसल्यची चर्चा आहे. संघ व्यवस्थापन २०२७ च्या विश्वचषकाच्या रणनीतीमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा विचार करत नाही आहे. एकदिवसीय संघात राहण्यासाठी दोघांनाही विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळावी लागू शकते. अशा परिस्थितीत विराट आणि रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी घोषणा करू शकतात की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका त्यांची शेवटची मालिका असणार आहे.
रोहित आणि विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतरही एकदिवसीय मालिकेत खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्य संघांसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे. त्यांना यावर्षी रणजी ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्येही खेळावे लागू शकते. त्यामुळे अशी चर्चा आहे की, दोन्ही क्रिकेटपटू ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल निर्णय घेऊ शकतात की, ही त्यांची शेवटची मालिका असेल.
दोन्ही क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. पण आता भविष्याकडे पाहण्याची वेळ आली आहे. कारण त्यांच्या मागे तरुण क्रिकेटपटूंची एक मोठी रांग आहे जी त्यांच्या संधीची वाट पाहत आहेत. आता संघ व्यवस्थापन २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी एक रणनीती तयार करत आहे. ज्यामध्ये कोहली आणि रोहित रणनीतीमध्ये बसत नाहीत. त्यामुळेच ऑस्ट्रेलिया मालिका रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी शेवटची एकदिवसीय खेळी ठरू शकते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका रोहित-विराटची अखेरची मालिका ठरणार ?
