GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत भाजपतर्फे शालेय वह्यांचे वाटप

Gramin Varta
16 Views

रत्नागिरी: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील बुथ क्रमांक १७२, १७३ व १७४ येथे विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत व प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी, शहर उपाध्यक्ष नितीन गांगण, शैलेश बेर्डे, महिला पदाधिकारी सौ. सायली बेर्डे, सौ. मेधा कुळकर्णी, प्रसाद बाष्टे, प्रवीण देसाई, तुषार देसाई, शहर कोषाध्यक्ष सोनाली आंबेरकर, स्थानिक पदाधिकारी रामचंद्र कदम, टोपकर, नाईक, अशोक हळकुट्टी, पिंट्या कोळी, अशोक शेंगणे आणि सौ. धोत्रे उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा संदेश दिला.

Total Visitor Counter

3199542
Share This Article