चिपळूणच्या वाशिष्ठी नदीपात्रात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Gramin Varta
231 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

चिपळूण : शहरातील पिंपळी सोनारवाडी येथील २५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिचा मृतदेह गोवळकोट येथील वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंकिता रविंद्र गोरीवाले असे मृत तरुणीचे नाव आहे.

अंकिता गोरीवाले ही २५ ऑगस्ट २०२६ रोजी बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या नातेवाईकांनी चिपळूण पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टर क्रमांक ४९/२०२६ अन्वये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता.

दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास गोवळकोट गावातील शिंदेवाडी परिसरातील वाशिष्ठी नदीकिनारी असलेल्या गणपती विसर्जन घाटाजवळ नदीच्या पात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. शोधमोहीमेदरम्यान मिळालेला मृतदेह अंकिता गोरीवाले हिचाच असल्याचे समोर आले.

मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी चिपळूण येथील उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे हलविण्यात आला. या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे.

अंकिता यांचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4777038
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *