लांजा/ अरबाज नेवरेकर : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून, त्याला तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंजनारी पूल येथे कंटेनरचा ताबा सुटल्याने तो रस्त्यावर पलटी झाल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर आले आहे. कंटेनर उलटताच चालक आत अडकल्याने काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आवाज ऐकून ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेतली जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नासिर नावळेकर, पोलिस हवालदार विलास जाधव, अजित नदाफ तसेच चालक श्री. चाळके यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.
ब्रेकिंग : अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी
Leave a Comment





