लांजा : पोलीस पाटील संघटनेतर्फे ‘अति उत्कृष्ट सेवा पदका’बद्दल पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह तिघांचा सत्कार

Gramin Varta
14 Views

लांजा/अरबाज नेवरेकर :- भारत सरकारच्या गृह मंत्रालयामार्फत पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन आणि निष्कलंक सेवेची दखल घेऊन ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात येते. यावर्षी लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, भांबेड बीट अंमलदार आशिष वसंत शेलार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक साळवी यांना या मानाच्या पदकाने गौरविण्यात आले.

१५ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या तिघांना ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. त्यांच्या दीर्घकालीन, कर्तव्यनिष्ठ व निष्कलंक सेवेची दखल घेत त्यांना हा सन्मान प्राप्त झाला.

या सन्मानाबद्दल पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य, शाखा रत्नागिरी, उपशाखा लांजा यांच्या वतीने पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

यावेळी पोलीस पाटील संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कदम यांच्याशी कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली. पोलीस पाटील व पोलीस विभाग यांच्यातील समन्वय तसेच कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.

या मानाच्या सन्मानाबद्दल पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, आशिष वसंत शेलार व पोलीस उपनिरीक्षक साळवी यांचे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Total Visitors :
4740601
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *