गुहागरमध्ये घरातून ४५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
156 Views

गुहागर : गुहागर शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरातून ४५ वर्षीय व्यक्ती घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी परिसरासह सर्वत्र शोध घेऊनही संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र बाळकृष्ण रहाटे (वय ४५, रा. छत्रपती शिवाजी चौक, गुहागर, जि. रत्नागिरी) हे २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले. ते मनोरुग्ण असल्याचेही पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

महेंद्र रहाटे घरातून निघून गेल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी तसेच परिचितांनी आजूबाजूच्या परिसरात आणि नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतला. मात्र, सर्वत्र शोध घेऊनही ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सुधाकर मधुकर सांगळे (वय ५७, व्यवसाय रिक्षाचालक, रा. वरचापाट दुर्गादेवीवाडी, गुहागर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 140(3) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 दाखल करण्यात आला आहे. गुन्हा ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.०४ वाजता दाखल करण्यात आला असून, बेपत्ता महेंद्र रहाटे यांचा शोध घेण्यासह प्रकरणाचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4820491
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *