मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित चित्रपट “अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी” संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यायालय हा चित्रपट या आठवड्याच्या शेवटी पाहणार असून सोमवारी(दि. २५) आपला आदेश देणार आहे. या चित्रपटाची निर्मिती सम्राट सिनेमॅटिक प्रोडक्शन हाऊसने केली आहे.
सुरुवातीला सेंसर बोर्ड (सीबीएफसी) ने चित्रपट पाहिल्याशिवायच निर्मात्याच्या सर्टिफिकेशन अर्जाला नकार दिला होता. याविरोधात प्रोडक्शन हाऊसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सीबीएफसीला निर्देश दिला की त्यांनी चित्रपट पाहावा आणि नंतर निर्णय घ्यावा. त्यानंतर सीबीएफसीच्या एक्झामिनेशन कमिटीने चित्रपट पाहिला, पण कोणताही ठोस कारण न देता सर्टिफिकेशन नाकारले.
यानंतर हे प्रकरण पुन्हा कोर्टात गेले, जिथे सीबीएफसी ने चित्रपट न मंजूर करण्यासाठी 29 डायलॉग्सचे कारण दिले. मात्र निर्मात्यांनी असा युक्तिवाद केला की योग्य कारणांशिवाय चित्रपट रोखण्यात आला आहे. त्यानंतर सीबीएफसी च्या रिव्हायझिंग कमिटीने चित्रपट पाहिला आणि 8 कारणे रद्द केली, पण 21 कारणे कायम ठेवून पुन्हा सर्टिफिकेशन नाकारले.
चित्रपट निर्मात्यांचे वकील सातत्य आनंद म्हणाले”सीबीएफसीने जे कारणे सांगितली आहेत, ते असे संवाद आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात वापरतो. त्या संवादांचा उपयोग आपण दैनंदिन बोलण्यात करतो. म्हणूनच आम्ही न्यायालयाचा वारंवार आधार घेतला आणि सीबीएफसीने जे काही केलं, ते सर्व न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. यानंतर आता न्यायालयाने स्वतः चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते ठरवतील की पुढे काय करायचं.”
निर्मात्यांचे म्हणणे आहे की, ना स्पष्टपणे कट किंवा संपादनाचे निर्देश दिले गेले, ना ठोस कारण देण्यात आले, फक्त 21 कारणे सांगून चित्रपट नाकारण्यात आला. चित्रपटात योगी आदित्यनाथ यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय मेंगी यांनी सांगितले की, “आम्ही खूप प्रयत्न केले की सेंसर बोर्डने चित्रपटाला सर्टिफिकेट द्यावे, पण जेव्हा सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले, तेव्हा आम्ही बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. आम्हाला विश्वास आहे की न्यायालय आम्हाला न्याय देईल आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल.”
मुंबई हायकोर्ट पाहणार योगी आदित्यनाथ यांच्यावरील चित्रपट; सोमवारी देणार अंतिम निर्णय
