GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : कळझोंडी येथे कामाच्या वादातून मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
257 Views

रत्नागिरी : तालुक्यातील कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरून एका व्यक्तीला दोघांनी मारहाण केल्याची घटना 29 जून 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि सुनील पवार (दोघेही रा. विजापूर, कर्नाटक) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशोक धनसिंग पवार (40, मुळ रा. कर्नाटक, सध्या रा. वाटद खंडाळा) यांनी तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी आणि संशयित हे तिघे संगमेश्वर येथे कामाची पाहणी करण्यास गेले होते. परत येताना तिघांनी जाकादेवी येथील एका बारमध्ये थांबून मद्यपान केले. त्यानंतर कामाच्या कारणावरून वाद निर्माण झाला.

वादानंतर फिर्यादी अशोक पवार दुचाकीवरून घरी जात होते. वाटेत लघुशंकेसाठी थांबले असता, संशयित दोघांनी भांडणाचा राग धरून त्यांना शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी खाली पडल्यावर त्यांना “याबाबत कोणाला सांगितले तर ठार मारू” अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर बाजूचा दगड उचलून त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाण करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेनंतर दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199472
Share This Article