GRAMIN SEARCH BANNER

खेडच्या प्रणित मोरेची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री, मराठमोळा स्टँडअप कॉमेडियन गाजवणार सलमानचा शो

Gramin Varta
5 Views

रत्नागिरी: ज्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते ‘बिग बॉस १९’ हे पर्व सुरू झालं आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अनेक स्पर्धकांची नावंही समोर आली होती.

पण, एका मराठमोळ्या स्पर्धकाने ‘बिग बॉस १९’मध्ये एन्ट्री घेतली आहे. ज्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हा मराठमोळा स्पर्धक म्हणजे स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे.

मुळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्याचा प्रणित मोरे आता बिग बॉसच्या घरात आपले स्थान निर्माण करणार आहे. प्रणित मोरे हा रत्नागिरीतील खेड तालुक्याचा असला तरी त्याचा जन्म मुंबई मध्ये झाला असून त्याचे शिक्षण ही मुंबई येथे झाले आहे.

प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रणितला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. बिग बॉसच्या मंचावर येताच प्रणितने सलमानलाही मराठीत बोलण्यास भाग पाडलं. बिग बॉसच्या मंचावर प्रणितने त्याच्या स्टँडअप कॉमेडीने सगळ्यांचीच मनं जिंकली.

प्रणित हा एक लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केलं आहे. त्याच्या शोजसाठी चाहते तुफान गर्दी करतात. प्रणित हिंदी आणि मराठीमध्ये स्टँडअप कॉमेडी करतो. त्याचे अनेक रील्सही व्हायरल होताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरातून तो प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार आणि शोमध्ये टिकून राहण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजी वापरणार हे पाहावं लागेल.

Total Visitor Counter

2652673
Share This Article