‘कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा’ निकाल जाहीर
उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडून स्पर्धेची दखल
रत्नागिरी (प्रतिनिधी ) :- रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आयोजित “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” मोठ्या दिमाखात पार पडली. तालुकाभर फिरून गेले दोन दिवस तज्ज्ञ परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. आज या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेत मिरजोळे येथील आशिष वाडकर आणि परिवाराने हुबेहूब साकारलेला श्री देव भैरी मंदिर देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. या स्पर्धेला उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण तथा भैय्याशेठ सामंत यांनी प्रयोजकत्त्व देऊन स्पर्धेची दखल घेतली आहे.
प्रतिवर्षीपेक्षा यंदा या स्पर्धेत तालुकाभरातून अधिक स्पर्धेकांनी आपला सहभाग नोंदवला. एकूण 115 स्पर्धेकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. प्रचंड पावसाचे दिवस असूनही स्पर्धेकांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षकांनी गणपती सजावट, देखव्यांचे परीक्षण केले. गणेशभक्तांनी अगदी मनोभावे सजावट व पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक असे विविध देखावे सादर केले होते. गणेशभक्तांनी असे देखावे, सजावट तयार करावी, हे प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे कांचन यांनी यानिमित्ताने सांगितले.
स्पर्धेचे यंदा 6 वे वर्ष होते. यंदा शहरापेक्षा ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी सादर केलेले देखावे थक्क करणारे होते. वैशिष्ट्यपूर्ण, तसेच मुख्यत्त्वे इकोफ्रेंडली सजावट व देखव्यांना प्राधान्य देत परीक्षकांनी निकाल जाहीर केला आहे. अर्थातच यामध्ये सहभागी सर्वच स्पर्धकांचे परीक्षकांनी कौतुक केले आहे. परीक्षक मंडळात कांचन मालगुंडकर, नरेंद्र पाटील, अभिजीत नांदगावकर, विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, मुकुंद पिलणकर, शकील गवाणकर, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, अजिंक्य सनगरे आदींचा समावेश होता.
तर या स्पर्धेला अमेय ज्वेलर्स-रत्नागिरी, ज्योती क्रांती मल्टीस्टेट-रत्नागिरी, प्रसन्नशेठ आंबुलकर, राजुशेठ घाग, सौरभशेठ मलुष्टे, विजयशेठ खेडेकर, स्वानंद ज्वेलर्स, पद्मावती कंट्रक्शन, आरती डायनिंग, अनबॉक्स, अरिहंत कंट्रक्शन, राधेश्याम स्वीट मार्ट, श्रेयश मेडिकल, जयेश मंगल कार्यालय, राजू कीर यांनी प्रयोजकत्त्व दिले. लवकरच या स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण सोहळा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
“कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा 2025″चा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :-
• प्रथम क्रमांक (15 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – श्री देव भैरी मंदिर देखावा, लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे (आशिष वाडकर)
• द्वितीय क्रमांक (10 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – संत एकनाथ महाराज देखावा ( राहुल पाडावे,एकता परिवार, मिरजोळे )
• तृतीय क्रमांक (6 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र) – रेड्यामुखी वेद, संत ज्ञानेश्वर (संतोष कडू, पड्यारवाडी, गावखडी)
सुबक गणेशमूर्ती – (3 हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र )
• साईराज वाडकर (लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे )
• वामन सुवारे (फगरवठार, साळवी बंधू देखावा )
विशेष उल्लेखनीय – ( 1हजार 500/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
• चारुदत्त धालवलकर (केदारनाथ देखावा, गावखडी)
• संजय वर्तक (शाळा दुरुस्ती देखावा, कुवारबाव)
• तरळ बंधू (सुंभ सजावट, भाट्ये)
• संदीप मेस्त्री ( लोंगेवाला युद्ध, जयगड )
• जीवन कोळवणकर (मत्स्यावतार, कुवारबाव)
• श्रीपाद शिवलकर ( जीवन क्षणभंगूर, बसणी )
• मयूर भितळे ( सांबरे हॉस्पिटल, सोमेश्वर )
• सुहानी गोताड ( शिवकालीन देखावा, कोतवडे)
उत्तेजनार्थ पारितोषिक -( 1हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र
• कौस्तुभ आंबेकर (केदारेश्वर, मिरजोळे )
• सलोनी शेलार (पर्यावरणाचा सन्मान, रत्नागिरी )
• रमेश माचकर (झाडे जगवा, शिरगांव)
• शशांक शिंदे (गड-किल्ले, वेतोशी )
• दीपिका कुबल (वारली पेंटिंग, बंदररोड, किल्ला )
प्रोत्साहनपर पारितोषिक ( 500 व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र)
• वेद लोंढे (शिवपिंडी, शिरगांव)
• स्वप्निल ठिक (कल्पवृक्ष, शिरगांव )
• अविनाश शिंदे (जेजुरी, जांभरूण )
• यश कानडे (एकविरा आई, फणसवळे )
• चंद्रकांत माने (पंढरीची वारी, केळ्ये )
• मनोज भाटकर (मंदिर, भाट्ये )
• सर्वेश मेस्त्री ( जि.प. शाळा बचाव, नाखरे )






