अरबाज नेवरेकर ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित

Gramin Varta
305 Views

लांजा : सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेल्या लांजा येथील युवा समाजसेवक आणि ग्रामीण वार्ताचे प्रतिनिधी अरबाज नेवरेकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बेळगाव येथील कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर येथे आयोजित ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड २०२६’ या भव्य सोहळ्यात नेवरेकर यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कोल्हापूरमधील रिजेंटा हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या या विशेष कार्यक्रमास समाजसेवा, शिक्षण, उद्योग आणि साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. डॉ. कल्पना इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात डॉ. शंकर अंदानी, डॉ. प्रकाश कदम, डॉ. विक्रम शिंगाडे आणि प्रीती मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.

नेवरेकर हे गेल्या काही काळापासून ग्रामीण भागात जनजागृती आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांत सक्रिय आहेत. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांनी केलेले कार्य विचारात घेऊन ट्रस्टने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतात नेवरेकर यांनी, हा सन्मान केवळ माझा नसून लांजातील माझ्या सर्व मार्गदर्शकांचा, हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा असल्याचे नमूद केले. तसेच, मिळालेल्या या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक जोमाने आणि जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. नेवरेकर यांच्या या यशाचे लांजा शहरासह संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *