आगामी मोहरमच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्यात बैठक ; मोहरम शांततेत पार पाडण्याचे मुस्लिम बांधवांना आवाहन

Gramin Varta
318 Views

लांजा/फरहान पाटणकर: आगामी मोहरमच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुक्यातील विविध गावांतील मुस्लिम समाजाच्या अध्यक्षांची बैठक शनिवार २० जून सकाळी ११ वाजता लांजा पोलीस ठाण्यात पार पडली. यावेळी मोहरम शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन पोलीसांच्यावतीने करण्यात आले.

यंदा मोहरमनिमित्त २५ व २६ जून रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे होणार आहेत. या अनुषंगाने उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वांनी सामाजिक सलोखा जपावा, यासाठी पोलिस प्रशासनाने बैठकीत आवश्यक सूचना दिल्या.

तसेच या बैठकीत मोहरम साजरा करताना इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करत वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, कार्यक्रम वेळेत पूर्ण करणे, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा प्रभारी लांजा उपविभाग मुख्त्यार शेख आणि लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. दरम्यान, यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी मोहरम शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Total Visitors :
4576811
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *