लांजा-साटवली मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; वाहनचालकांचे हाल

Gramin Varta
310 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर: तालुक्यात पावसाने हजेरी लावताच पालयेवाडी येथे लांजा-साटवली मार्गावर एक मोठे आकेशियाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आज सकाळी घडलेल्या या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सकाळची वेळ असल्याने शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी आणि नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना प्रवासात विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, जोरदार वारे आणि पावसाचा अंदाज घेऊन रस्त्यालगतची धोकादायक झाडे प्रशासनाने वेळीच काढावीत, अशी मागणी आता संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :
4576961
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *