खेडमध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाने साजरा ना. नितेश राणे यांचा वाढदिवस

Gramin Varta
93 Views

खेड: महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. नितेशजी नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खेड तालुका शाखेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तालुक्यातील नागरिकांना वृक्ष भेट देण्यात आले. खेड येथे आयोजित या उपक्रमाद्वारे निसर्ग रक्षणाचा संकल्प करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभवजी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व नगरसेवक गटनेते श्री. रहीम भाई सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष श्री. ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री. भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष सौ. प्रीती ताई चिखले, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, श्री. चेतन धामणकर, डॉ. विक्रांत पाटील, स्वरूप दळी, स्वराज गांधी, अक्षय जांभूळकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4820522
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *