रत्नागिरीत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Gramin Varta
149 Views

रत्नागिरी : शहरानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय परिसरातून भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सुदिप निताई प्रमाणिक (वय २६, मूळ रा. वर्दमान, पश्चिम बंगाल, सध्या रा. भाटये) यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून २०२६ रोजी दुपारी १.०० ते १.०५ या पाच मिनिटांच्या कालावधीत ही चोरी झाली.

फिर्यादी आपली होंडा कंपनीची शाईन दुचाकी (क्रमांक एमएच ४९/सीव्ही/२०१०) पी.डब्ल्यू.डी. उत्तर कार्यालय आवारात उभी करून ठेवली होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय ८० हजार रुपये किमतीची ही काळ्या रंगाची दुचाकी लंपास केली. या प्रकरणी  भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *