खेडमधील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलची ऐतिहासिक कामगिरी; एकाच बॅचमधील १५ विद्यार्थी बनले डॉक्टर

Gramin Varta
165 Views

खेड : शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचा नवा मापदंड प्रस्थापित करत खेडच्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. रोटरी प्रतिष्ठान संचलित या शाळेच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील NEET बॅचमधील तब्बल १५ विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून डॉक्टरकीची पदवी संपादन केली आहे. एकाच शाळेच्या एकाच बॅचमधील १५ विद्यार्थी डॉक्टर होणे, ही बाब कोकणातील शैक्षणिक इतिहासातील एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद घटना मानली जात आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम करणाऱ्या रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलने सातत्याने NEET आणि JEE परीक्षेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. मात्र, या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले यश संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि मेहनतीची साक्ष देणारे आहे. या यशस्वी डॉक्टर विद्यार्थ्यांमध्ये डॉ. अद्वैत भोसले, डॉ. श्रावणी पार्थे, डॉ. पूजा राजपूत, डॉ. श्रद्धा खेडेकर, डॉ. यश गांगल, डॉ. अय्युब चौगुले, डॉ. मुक्ताई धामणसकर, डॉ. प्रेरणा गुजर, डॉ. सानिया मेमन, डॉ. धनश्री गावणकर, डॉ. अमेय मोरे, डॉ. आदित्य पोंक्षे, डॉ. श्रुती यादव, डॉ. मधुरा बोंडले आणि डॉ. अन्वी तलाठी यांचा समावेश आहे. केवळ बोर्डाच्या परीक्षेतच नव्हे, तर देशातील नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्यापर्यंतचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण प्रवास घडवण्यात या शाळेने यश मिळवले आहे. ही केवळ एक संस्था नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची चळवळ असल्याचे सिद्ध झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतर्फे २५ जून २०२६ पासून NEET रिपीटर बॅच सुरू करण्यात आली असून, रोटरीची ही यशोगाथा आता संपूर्ण कोकणासाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Total Visitors :
4576798
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *