संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून सन्मान सोहळा संपन्न

Gramin Varta
163 Views

संगमेश्वर/ नियाज खान: संगमेश्वर पोलीस ठाण्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांचा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व विविध दक्षता कमिटीच्या सदस्यांच्या वतीने नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. या स्वागत सोहळ्यात पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत परिसरातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
या सत्कार प्रसंगी महिला व सुरक्षा कमिटीच्या सदस्य अर्चिता राहुल कोकाटे आणि नावडी येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या माधवीताई भिडे यांनी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी ‘पोलीस तपास’ साप्ताहिक वार्तापत्राचे नवनियुक्त उपसंपादक दिनेश अंब्रे यांचा सत्कार पोलीस निरीक्षक पालवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, कोंड असुर्डे येथील पत्रकार प्रशांत पोवळे यांनीही विशेष कार्यकारी अधिकारी आणि पोलीस मित्रांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक पालवे यांचा सन्मान केला. यासोबतच कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास बरगाले यांचाही प्रशांत पोवळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :
4576952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *