नगरसेवक रफिक नेवरेकर यांच्यावतीने रुग्णांना फळवाटप

Gramin Varta
226 Views

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी

लांजा/फरहान पाटणकर: येथील नगरसेवक रफिक उर्फ गुल्ल्या नेवरेकर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप केले. वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च टाळून, सामाजिक बांधिलकी जपत हा सेवाभावी उपक्रम रफिक नेवरेकर यांनी राबविला.

रुग्णांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांना फळांचा आहार मिळावा आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता व्यक्त करावी या मुख्य उद्देशातून या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने लांजा ग्रामीण रुग्णालयात गरजू आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांना रफिक नेवरेकर यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, यावेळी रुग्णालयातील सर्व वॉर्डमध्ये जाऊन रफिक नेवरेकर यांनी रुग्णांची चौकशी केली. तर या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले होते. याप्रसंगी रफिक नेवरेकर यांच्यासोबत असीम पाटणकर, वसीम मुजावर, राजू मुजावर, तन्वीर नेवरेकर, आजीम मापारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4821032
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *