डी.बी.जे. महाविद्यालयात जिल्हास्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव कार्यशाळा उत्साहात संपन्न

Gramin Varta
111 Views

चिपळूण: मुंबई विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण विभाग आणि डी.बी.जे. महाविद्यालय (स्वायत्त), चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने ५९ व्या युवा महोत्सवानिमित्त आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत उत्तर आणि दक्षिण रत्नागिरी विभागातील ३६ महाविद्यालयांमधील ३९ प्राध्यापक व ११० विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन न.ए. सोसायटीचे व्हाइस चेअरमन दीपक विखारे, प्राचार्य डॉ. एम. एस. बापट, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठाचा सांस्कृतिक युवा महोत्सव विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांना अर्थार्जनासाठी सक्षम बनवतो, असे प्रतिपादन करत समन्वयक निलेश सावे यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मयूर मगरे, तुषार शिरसाट, साहिल जोशी, मानस साखरपेकर, अमोल बावकर आणि निलेश सावे यांनी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश सावे यांनी केले, तर डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. बापट यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणातून दीपक विखारे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राहुल पवार यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी नियोजनासाठी सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी मोलाचे योगदान दिले.

Total Visitors :
4576765
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *