रायपाटण येथे उद्या मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर; तज्ज्ञांकडून होणार मोफत तपासणी

Gramin Varta
143 Views

पाचल / तुषार पाचलकर: मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि ग्रामीण रुग्णालय रायपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे भव्य ‘मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्यदायी उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करणे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये रक्तदाब (बीपी) तपासणी आणि मधुमेह (शुगर) तपासणीची विशेष सुविधा उपलब्ध असणार आहे. यासह मौखिक आरोग्य तपासणी, जेरियाट्रिक (वृद्धत्वाशी संबंधित आजार) आणि उपशामक काळजी (पॅलिएटिव्ह केअर) यांसारख्या सेवाही रुग्णांना मिळणार आहेत.

शिबिराच्या ठिकाणीच आवश्यक लॅब टेस्ट आणि एक्स-रेची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही. आरोग्यसेवेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. राजापूर तालुक्यातील रायपाटण आणि परिसरातील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय रायपाटण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :
4820460
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *