डॉ. शामिना परकार यांची एएमजेएफ झोन चेअरमनपदी निवड; चिपळूणमध्ये सत्कार

Gramin Varta
56 Views

चिपळूण : चिपळूणच्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. शामिना परकार यांची एएमजेएफच्या झोन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल चिपळूण मुस्लिम ऑक्टिव्ह महिला सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात डॉ. शामिना परकार यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा, पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी डॉ. परकार यांच्या सामाजिक कार्याचा, नेतृत्वगुणांचा आणि समाजासाठीच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या निवडीचे स्वागत केले.

यावेळी डॉ. रेहमत जबले, नगरसेविका सफा गोठे, नगरसेविका नसरीन खुडस, समाजसेविका सरहुदा शेखजादे, आना दलवाई, हजीरा दलवाई, शबाना परकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वक्त्यांनी डॉ. शामिना परकार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी विविध सामाजिक आणि सक्षमीकरणाचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी चिपळूण मुस्लिम ऑक्टिव्ह महिला सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. शामिना परकार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नव्या जबाबदारीत यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitors :
4820685
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *