रत्नागिरी: खडपेवठार परिसरात अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई

Gramin Varta
306 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडपेवठार जाणाऱ्या रोडवर रत्नसागर कॉम्प्लेक्ससमोर अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अदनान शफीक फणसोपकर (वय ३०, रा. घर नं. २४७, कर्ला, मशिदीचे पुढे, ता. जि. रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार वैभव गजानन मोरे (वय ३९, नेमणूक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी) यांनी फिर्यादी दिली आहे. २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १९.५१ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी २३ जुलै २०२६ रोजी रात्री २३.०५ वाजता शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खडपेवठार जाणारे रोडवर रत्नसागर कॉम्प्लेक्ससमोर संशयित आरोपी अदनान शफीक फणसोपकर हा अंमली पदार्थ सेवन करण्याचे साहित्य स्वतःजवळ बाळगून अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून १० रुपये किमतीची एक वापरती चिलीम आणि १० रुपये किमतीचे एक लाल रंगाचे वापरते लाईटर असा एकूण २० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

Total Visitors :
4580872
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *