कोयना धरण “छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ नावाने ओळखले जाणार

Gramin Varta
135 Views

सातारा: पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ असे करण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहसिक निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

जलशयाचे नामांतर करण्याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून आता कोयना जलसागरात छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे ओळखले जाईल. जलसागराचे नामांतर करण्याच्या जलसंपदा विभागाच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानंतर शासन निर्णय जारी झाल्याने येथून पुढे शासनाचा पत्रव्यवहार आणि अभिलेखामध्ये तसा उल्लेख करण्यात येईल असे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी आभार मानताना म्हटले आहे.

Total Visitors :
4602486
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *