दिल्लीच्या मैदानावर चिपळूणच्या खेळाडूंचा दणदणीत विजय, मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचा संघ ठरला विजयी

Gramin Varta
4 Views

चिपळूण: चिपळूणच्या मास्टर्स क्रिकेट अकॅडमीने दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करत शानदार विजय मिळवला आहे. दिल्लीच्या मैदानावर आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघावर मात केली. या विजयासह मास्टर्स क्रिकेट अकॅडमीने दिल्लीतील आपल्या मोहिमेला अभिमानास्पद यशाची जोड दिली आहे.

महाराष्ट्राच्या मातीतून दिल्लीपर्यंतचा हा प्रवास केवळ क्रिकेटचा नसून मेहनत, शिस्त, संघर्ष आणि आत्मविश्वासाचा असल्याचे सिद्ध झाले आहे. चिपळूणच्या खेळाडूंच्या या दर्जेदार कामगिरीमुळे दिल्लीच्या मैदानावर संघाची मोठी छाप पडली असून मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचा विजयाचा झेंडा पुन्हा एकदा उच्चांकीवर उंचावला आहे.संतोष पिलके यांनी दिलेल्या वृत्तमानुसार या विजयामुळे चिपळूण तालुक्यात आणि क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Total Visitors :
4671916
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *