मंडणगड : म्हाप्रळ येथे सावित्री नदीच्या खाडीकिनारी आढळला तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
7 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

मंडणगड : तालुक्यातील म्हाप्रळ येथे सावित्री नदीच्या खाडीकिनारी चिखलामध्ये ३९ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. विशाल महादेव सुतार (वय ३९, रा. तळोशी, ता. महाड, जि. रायगड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्यापूर्वी म्हाप्रळ येथील सावित्री नदीच्या खाडीकिनारी मजीद अहमद मुकादम यांच्या प्लॉटजवळील चिखलाच्या ठिकाणी विशाल महादेव सुतार हे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून मृतदेहाची पाहणी करण्यात आली.

या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजून ३४ मिनिटांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत आमू. क्रमांक १५/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, विशाल सुतार यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4762566
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *