रत्नागिरी विशेष कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
129 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

रत्नागिरी : रत्नागिरी विशेष कारागृहात न्यायाधीन कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या ६१ वर्षीय कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दीपक गौराजी गमरे (रा. कळकवणे, बौद्धवाडी, ता. चिपळूण) असे मृत कैद्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक गमरे यांना कारागृहात असताना अस्थमा (दमा) तसेच अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे ११ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांना रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली. अखेर २५ ऑगस्ट रोजी रात्री ४.४२ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ. जिज्ञासा भाटे यांनी घोषित केले.

या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, प्राथमिकदृष्ट्या आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासकीय व कायदेशीर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जात असून, पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.

Total Visitors :
4770930
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *