मंडणगड येथील ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी मशीन सील

Gramin Varta
96 Views

जिल्हास्तरीय पथकाची ‘डिकॉय’ कारवाई

रत्नागिरी: मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील डॉ. प्रसाद प्रभाकर आंबेकर यांच्या ‘श्रद्धा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील सोनोग्राफी सेंटरवर जिल्हास्तरीय पथकाने डिकॉय कारवाई करत सोनोग्राफी मशीन सील केले आहे. पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

१ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हास्तरीय पथकाने या सोनोग्राफी सेंटरमध्ये डिकॉय केस केली. या तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या: केंद्रात नोंदणीकृत तज्ज्ञ डॉ. सुमन व्यास (स्त्रीरोगतज्ज्ञ) अनुपस्थित असताना, पीसीपीएनडीटी कायद्यानुसार सोनोग्राफी करण्यास सक्षम नसलेल्या डॉ. श्रद्धा आंबेकर (बीएएमएस) या स्वतः सोनोग्राफी करताना आढळून आल्या.

नोंदणीकृत तज्ज्ञ डॉक्टर गैरहजर असताना त्यांच्या नावाचा शिक्का मारून अहवालावर स्वाक्षरी केली जात असल्याचे निदर्शनास आले.
  सेंटरच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, स्त्रीरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ. सुमन व्यास या पुरुष रुग्णांची देखील सोनोग्राफी करत असल्याचे निष्पन्न झाले.

- Advertisement -

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत नियमांचा भंग आणि गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित सोनोग्राफी मशीन सील केले आहे.

Total Visitors :
4804480
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *