विद्यानंद बापट यांच्या गोळप येथील मूळ घरी पोलीस संरक्षण

Gramin Varta
190 Views

पुण्यात मारहाण झाल्यानंतर आई-वडिलांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त; कॉन्स्टेबल आणि होमगार्ड तैनात

रत्नागिरी : डीजेमुक्त गणेशोत्सवाचा आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण झाल्यानंतर त्यांच्या रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील मूळ घरी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. बापट यांच्या आई-वडिलांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड तैनात करण्यात आला असून, २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील गोळप हे विद्यानंद बापट यांचे मूळ गाव आहे. त्यांच्या गोळप येथील मूळ घरी वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट राहतात.

विद्यानंद बापट यांना काल पुण्यात मारहाण झाल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन विचारपूस केली होती. त्यानंतर आज दुपारनंतर बापट यांच्या घरासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार बापट यांच्या घराच्या सुरक्षेसाठी एक पोलीस कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड तैनात करण्यात आला असून, २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाची भूमिका योग्य असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले आहे. पुण्यातील घटनेनंतर बापट कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी पोलिसांनी हा बंदोबस्त तैनात केला आहे.

Total Visitors :
4807896
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *