दापोली : मंडणगडहून दापोलीकडे येणारी दापोली डेपोची ई-शिवाई एसटी बस बुधवारी दापोली-मंडणगड महामार्गावरील खोंडा परिसरात पेट्रोल पंपाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दापोली डेपोतून धावणारी ही इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवासाच्या दृष्टीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, ऐन प्रवासादरम्यान बसमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ई-शिवाई बस वारंवार बंद पडत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे नियोजित वेळापत्रक कोलमडत असून, पर्यायी वाहतूक व्यवस्था तातडीने उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एसटी प्रशासनाने या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल घेऊन बसची तातडीने योग्य दुरुस्ती करावी तसेच प्रवाशांना सुरळीत आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
दापोली डेपोची ‘ई-शिवाई’ बस बंद पडल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
Leave a Comment






