रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील रस्त्यावर बसून भाजीपाला, फळे, रानभाज्या आणि घरगुती प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर शाखेतर्फे व्यावसायिक पावसाळी छत्रीचे वाटप करण्यात आले. निलेश आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. प्रभागातील छोटे व्यावसायिक उन्हाची किंवा पावसाची तमा न बाळगता आपल्या उपजीविकेसाठी दररोज मेहनत करत असतात.
त्यांना या हवामानाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातून शेतमाल, भाजीपाला व फळे विक्रीसाठी आणणाऱ्या या कष्टकरी व्यावसायिकांना पावसाळ्यात दिलासा मिळावा, या उद्देशाने भाजपाने मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. या प्रसंगी शहर सरचिटणीस निलेश आखाडे, सौ. पूजा पवार, सौ. प्रज्ञा टाकळे, तेजस पवार, संदीप सावंत आणि सौ. निधी आखाडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात व्यवसाय करताना ही छत्री अत्यंत उपयोगी ठरणार असल्याने, व्यावसायिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या कार्याचे कौतुक केले.
