रवींद्र धंगेकर व पत्नी ‘नॉट रिचेबल’; अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल

Gramin Varta
149 Views

पुणे : बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्याप्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

दोघांनीही अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावरील सुनावणी सोमवारी होणार आहे.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धंगेकर दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्यानंतर अटकेची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, दोघेही सध्या ‘नॉट रिचेबल’ असून त्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

सोमवारी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार असून, त्यापूर्वी अटक होऊ नये यासाठी धंगेकर दाम्पत्य अज्ञातस्थळी गेल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून त्यांच्या ठिकाणाचा शोध सुरू आहे.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार करून गळफास घेत जीवन संपवले होते. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अन्य काही जणांना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकर दाम्पत्यासह एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4564830
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *