विकासात्मक कामाबाबत आमदार शेखर निकम यांच्यावर विश्वास…
संदीप घाग / सावर्डे
चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील असुर्डे-जांभुळवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात प्रवेश केला. विकासात्मक कामे होण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, “आमदार शेखर निकम हे जनतेशी जोडलेले नेते आहेत. मतदारसंघातील काम करताना ते भेदभाव करत नाहीत. कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची त्यांची पद्धत आम्हाला भावली. विकासात्मक कामे आणि प्रगतीसाठी तेच योग्य नेतृत्व आहे.”
आमदार शेखर निकम गेल्या काही वर्षांत मतदारसंघात विकासकामे पुढे नेत आहेत. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे जनतेत त्यांच्याविषयी विश्वास वाढला आहे. प्रवेशकर्त्यांनीही सांगितले की, “आगामी काळात वाडीचा आणि गावाचा विकास शेखर निकम यांच्या माध्यमातून नक्कीच होईल, अशी खात्री आम्हाला वाटते.”
आमदार शेखर निकम म्हणाले “माझ्या मतदारसंघातील प्रत्येक वाडीला आणि प्रत्येक गावाला मी आपलं कुटुंब मानतो. विकास हा केवळ रस्ते-पूल उभारण्यापुरता मर्यादित नसून, गावातला तरुण आत्मनिर्भर व्हावा, शेतकरी सुखी व्हावा, महिलांना आधार मिळावा, मुलांना चांगलं शिक्षण मिळावं – हीच खरी प्रगती आहे.
असुर्डे-जांभुळवाडीतील ग्रामस्थांनी आज माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो माझ्यासाठी खूप मोठं बळ आहे. तुमच्या या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. माझ्यासाठी पक्षीय मतभेद महत्त्वाचे नाहीत, गावकुसाचा विकास आणि जनतेचा आनंद हेच माझं खरं ध्येय आहे.
यांनी केला पक्षप्रवेश
समीर पाध्ये, भास्कर खापरे, रुपेश खापरे, मंगेश घडशी, सुधीर खापरे, सुदर्शन पाष्टे, तेजस खापरे, प्रतीक खापरे, संभाजी खापरे, तानाजी खापरे, रुपेश घडशी, प्रितेश घडशी, वैभव खापरे, मयूर खापरे, अजित कदम, आशिष खापरे, शुभम खापरे, अमर खापरे, गणेश घडशी, अक्षय बागवे, संस्कार खापरे, सुरज खापरे, मनोज खापरे, विजय खापरे, रवी खापरे, विकास खापरे, ज्ञानेश घडशी, सनी खापरे, अरुण खापरे.
यावेळी राजेंद्र सुर्वे (संचालक, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक), पंकज साळवी (सरपंच असुर्डे), संजय कदम (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – कोकरे जिल्हा परिषद गट), समीर काझी, विजय भुवड तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.