गुहागर: कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून गणेशोत्सवा निमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
गौरी आगमनाचे औचित्य साधत गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीतील रॉयल प्रतिष्ठान तर्फे स्तुत्य असा उपक्रम हाती घेत स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी रविवार दिनांक ३१ऑगस्ट २०२५ रोजी लहान मुलांसाठी वयोगट (२ ते १० वर्ष)”फॅन्सी ड्रेस स्पर्धा- २०२५ चे” आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेत मुली-०८ आणि मुले-१० असे एकूण १८ मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली कला सादर केली व उपस्थितांची मने जिंकली. सहभागी तसेच विजेत्या मुलामुलींना बक्षीस म्हणून शालेयउपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.स्पर्धेला उपस्थितीत आंबेकरवाडीतील पोलिस पाटील वासंतीताई आंबेकर तसेच गंगाराम आंबेकर,मनोहर आंबेकर,नितीन आंबेकर,योगेश आंबेकर, शैलेश आंबेकर,प्रकाश आंबेकर,हेमंत आंबेकर,स्वीकार आंबेकर,राजेश आंबेकर, शिशिर आंबेकर,जयेश आंबेकर सतीश आंबेकर, प्रवीना आंबेकर,प्रणाली आंबेकर,अश्विनी आंबेकर यांच्या हस्ते सदर बक्षीस वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी “रॉयल प्रतिष्ठान-उमराठ आंबेकर वाडीचे पदाधिकारी सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.प्रतिवर्षी नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे रॉयल प्रतिष्ठानचे प्रतिनिधी संदिप आंबेकर यांनी सांगितले.