रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक असलेल्या ‘फार्मर आयडी’साठी रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३३ हजार ३१५ शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एकूण पात्र शेतकरी संख्या १ लाख ७२ हजार ४५७ असून, अद्याप ३९ हजार १४२ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यामुळे त्यांना योजनेच्या २०व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे.
चिपळूण तालुका फार्मर आयडी नोंदणीत सर्वात आघाडीवर आहे, तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी नोंदणी झाली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक आहे.
*जिल्हानिहाय नोंदणी न केलेले शेतकरी (तालुकानिहाय)*
◼️चिपळूण : २०,२९७
◼️रत्नागिरी : ८,२२४
◼️संगमेश्वर : ६,१४१
◼️दापोली : ६,०३०
◼️गुहागर : ४,०९५
◼️खेड : ३,८३५
◼️राजापूर : ४,८२५
◼️मंडणगड : १,५७२
◼️लांजा : १४७
*शासनाच्या दोन्ही योजना*
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (२०१९ पासून) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी (२०२३-२४ पासून) – यांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ आवश्यक आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिपळूण तालुका ‘फार्मर आयडी’ नोंदणीत आघाडीवर; जिल्ह्यात १.३३ लाख शेतकऱ्यांची नोंदणी
