GRAMIN SEARCH BANNER

प्रो कबड्डी लीग २०२५ च्या १२ व्या हंगामाची शुभ सुरुवात

Gramin Varta
8 Views

लालबागच्या राजाच्या चरणी प्रो कबड्डी ट्रॉफी

मुंबई : प्रो कबड्डी लीग २०२५ हंगामाला यंदा खास सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडपात प्रो कबड्डी ट्रॉफीचे दर्शन घडले आणि राष्ट्रीय क्रीडा दिनी हा अनोखा सोहळा पार पडला.

कबड्डी या देशी खेळाचे दैवताच्या चरणी अर्पण करून खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या. १२वा हंगाम २९ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार असून, त्यानंतर सामने जयपूर (१२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर), चेन्नई (२९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर) आणि नवी दिल्ली (११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर) येथे रंगणार आहेत. प्रो कबड्डी लीग हंगाम १२ चे सामने जिओहॉटस्टर आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत.

Total Visitor Counter

2648143
Share This Article