GRAMIN SEARCH BANNER

लांजा : सापडलेले पाकीट परत करून कान्होजी नेमण यांचा आदर्शवत प्रामाणिकपणा

Gramin Varta
327 Views

लांजा : येथील बाजारपेठेत सापडलेले पाकीट आणि त्यातील रोख रक्कम मूळ मालकाला परत करून चाफेट नेमणवाडी (ता. लांजा) येथील कान्होजी जाणू नेमण यांनी प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे लांजा परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

घटनेचा तपशील असा की, गवाणे रेवाळेवाडी येथील रुपेश बापू रेवाळे हा तरुण सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी काही कामानिमित्त लांजा बाजारपेठेत आला होता. दुपारी सुमारे १२.३० वाजता गडबडीत त्याचे पाकीट खाली पडले. या पाकिटात ३ हजार रुपये रोख रक्कम, ड्रायव्हिंग लायसन्स, आधारकार्ड आणि पॅनकार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.

दरम्यान, हे पाकीट कान्होजी नेमण यांच्या हाती लागले. त्यांनी कोणताही विचार न करता थेट दुपारी दोनच्या सुमारास ते पाकीट लांजा पोलीस ठाण्यात जमा केले. योगायोगाने त्याच वेळी पाकीट हरवलेला रुपेश रेवाळे तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता. पोलिसांनी पडताळणी करून ते पाकीट रेवाळे यांच्या ताब्यात परत दिले.

या वेळी पोलीस उपनिरीक्षक संदीप साळुंके व चालक उमाजी बजागे उपस्थित होते.
कान्होजी नेमण यांच्या या प्रामाणिक आणि आदर्शवत वागणुकीमुळे स्थानिक समाजातून त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कृतीने समाजात प्रामाणिकपणाचे मूल्य अधोरेखित केले आहे.

Total Visitor Counter

3388208
Share This Article