खोपोली ः खालापूर तालुक्यातील चावणी या ग्रामीण भागातील वन खात्याच्या ताब्यातील वृक्षतोड करून खैर जातीची लाकडे चोरणारी टोळी खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी खालापूर यांच्या सतर्कतेमुळे पाहाटेच्या दरम्यान टोळीचा साफला रचून गजाआड करण्यात आले आहे.
या कारवाई पाच आरोपीसह पीक अप जीप व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने पाच दिवसाची वन कोठडी सुनावली आहे.
वनपरिक्षेत्र खालापूर, परिमंडळ उंब्रामध्ये सोमवारी 15 मध्यरात्री ही धाडसी कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती खालापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांना मिळताच आपले सहकारी तपास अधिकारी वनपाल सुभाष राठोड, वनपाल खोपोली भगवान दळवी,वनपाल चिलठन संजय पगारे, अतुल ओव्हाळ, वनरक्षक मयुर निकम, वनरक्षक ,नितीन कराडे, वनरक्षक,अंकुश केंद्रे, वनरक्षक,चंदन नागरगोजे, वनरक्षक पांडु घुटे, वनरक्षक,गोरक्ष दहिफळे, वनरक्षक बालाजी सुर्यवंशी, वनरक्षक, महेश माने, वनरक्षक राजाराम पारधी यांनी ही कारवाई केली. पहाटे 3.30 च्या सुमारास एक पिकअप टेम्पो हा आला व पूर्वीपासून तोडलेल्या खैर जातीचे ओेंडके भरत असताना वन विभागाने ही कारवाई केली.
सर्व आरोपी रत्नागिरी जिल्ह्याचे
अंधाराचा फायदा घेऊन काही आरोपी पळून गेले. मात्र एक वाहन चालक रुपेश विनायक पवार, वय 34 यांना ताब्यात घेऊन वाहनाची तपासणी केली असता त्यात मौल्यवान वृक्ष प्रजाती खैर लाकडे दिसून आली. सदरील वाहनाचा पंचासह घटना स्थ्ळावर पंचनामा करुन आरोपी रुपेश विनायक पवार यांचा पुढील चौकशी कामी ताब्यात घेतले. वाहन शासकीय साजगाव डेपोवर आणले.
या गुन्ह्यात राम शिवाजी पवार, किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दिपक जाधव,,ऋतिक शशिकांत पवार (सर्व रा. , रा. कुडवळे, ता. दापोली, जि. रत्नागिरी हे वाहनासोबत असल्याचे सांगीतले. त्यानुसार चौकशी कामी राम शिवाजी पवार यांना शेमडी चावणी रस्ता येथुन मोटारसायकल ताब्यात घेतली. त्यानंतर उर्वरीत पळुन गेलेले आरोपी यांना चालक रुपेश विनायक पवार यांनी संपर्क करुन बोलवुन घेतले व पुढील किरण हरिश्चंद्र पवार, रोहित दिपक जाधव, ऋतिक शशिकांत पवार यांना पाली वाकण येथुन ताब्यात घेतले.
चौकशीत या सर्व आरोपीनी यापूर्वीही विविध भागातील राखीव वनातुन अवैध खैर वृक्षतोड करुन तस्करी करुन खैर लाकडांची विक्री केलेली आहे. न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता 5 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. आरोपी यांनी दिलेल्या जबाब नुसार मंडणगड याठिकाणी धाड टाकुन खैर माल 14 घ. मी. जप्त करुन वनपरिक्षेत्र अधिकारी दापोली यांच्या ताब्यात दिला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहा. वनसंरक्षक सागर माली, पनवेल यांच्या मार्गदर्शनात चालू आहे.
खोपोलीत खैराची तस्करी करणारी दापोलीची टोळी गजाआड
