“माझ्या मतदारसंघातील धनगर समाजाच्या पाठीशी मी भक्कम उभा”- आमदार किरण सामंत
धनगर वाड्यांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
पाचल/ तुषार पाचलकर: पाचल येथे पंचक्रातील धनगर समाजाचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत तसेच युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्या विशेष उपस्थितीने मेळाव्याला ऊर्जितावस्था लाभली.
या प्रसंगी समाजातील विविध प्रश्न, शैक्षणिक संधी, तरुणांसाठी रोजगार व शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यावर चर्चा झाली. समाजातील ऐक्य, एकोपा आणि पुढील पिढीच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.मेळाव्यात मोठ्या संख्येने धनगर समाजातील बांधवांनी उपस्थित राहून सामूहिक शक्तीचे प्रदर्शन केले.
“माझ्या मतदारसंघातील धनगर समाजाच्या पाठीशी मी भक्कम उभा” – आमदार किरण सामंत
पाचल (ता.राजापूर) येथे पंचक्रातील धनगर समाजाचा मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याला लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत व युवा नेत्या अपूर्वा सामंत यांच्या उपस्थितीने विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या प्रसंगी आमदार सामंत म्हणाले, “धनगर समाज हा मेहनती, कष्टकरी आणि प्रगतीशील समाज आहे. त्यांच्या प्रश्नांसाठी मी नेहमीच आवाज उठवला आहे आणि पुढेही माझ्या मतदारसंघातील धनगर समाजाच्या पाठीशी मी भक्कम उभा राहीन.”
मेळाव्यात समाजातील शैक्षणिक, रोजगार, शासनाच्या योजना व विविध हक्कांसंदर्भात चर्चा झाली. तसेच समाजातील ऐक्य व एकोपा टिकवून पुढील पिढीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. धनगर समाजाच्या मेळाव्यात आमदार किरण सामंत यांनी समाजाला विश्वास दिला. या मेळाव्याला युवा नेत्या अपूर्वा सामंत यांचीही उपस्थिती होती.
आमदार सामंत म्हणाले, मतदारसंघातील धनगर वाड्यांच्या विकासासाठी एकही रुपया निधी कमी पडू देणार नाही. समाजातील सर्व वाड्यांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यासाठी सातत्याने प्रयत्न करून प्रत्यक्ष कामे उभी केली जातील.
यावेळी धनगर समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आमदार सामंतांच्या भूमिकेचे स्वागत केले. समाजातील प्रश्नांवर विधायक चर्चा होऊन एकात्मता व विकासाचा निर्धार करण्यात आला.
या कार्यक्रमाला पंचक्रातील मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित राहिले.






