रत्नागिरी : बसस्थानकासमोरील अरिहंत मॉल येथे दिनांक ४ ऑक्टोबर रोजी मा. ना. डॉ. उदयजी सामंत (मंत्री – उद्योग व मराठी भाषा) यांच्या शुभहस्ते ‘श्री बालाजी डिजिटल कॅमेरा स्टोअर’ या नव्या दुकानाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुशेठ म्हाप, फोटोग्राफर असोसिएशनचे कार्याध्यक्ष गुरु चौगुले, तसेच स्टोअरचे मालक रवींद्र धस आणि त्यांचा परिवार उपस्थित होते. याशिवाय, रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील फोटोग्राफर बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या नव्या डिजिटल कॅमेरा स्टोअरमुळे रत्नागिरीतील फोटोग्राफी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. उद्घाटन सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘श्री बालाजी डिजिटल कॅमेरा स्टोअर’चे उद्घाटन
