शेनवडेतील सरपंच दत्तराम लाखन यांच्या घरासह इतर घरातही पुराचे पाणी
संगमेश्वर : कुचांबे कोंडभैरव येथील महिपत दुडे ठिकाणी घरावर दरड कोसळली आहे त्यांच्यासहीत तीन घरातील कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढले असून कुचंबे येथील दुडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुचांबे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम काजवे, काशीराम लाखन माझी पोलीस दुडे, चंद्रकांत कदम, आत्माराम भोमकर, दिनेश राक्षे, सुहास पंडव, तुकाराम बागवे, सुनील लाखन यांनी दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे.
या ठिकाणी एकूण तीन घरांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. तसेच शेनवडे येथील सरपंच दत्ताराम लाखन यांच्यासह आसपासच्या घरामध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने येथील घरांना धोका निर्माण झालेला आहे तसेच गाड्यांचे आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नायब तहसीलदार गोताड यांच्या सूचनेनंतर ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी घालवण्याचे काम सुरू आहे. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी पहाणी केली . धामणी गोळवली , पूरग्रस्त ठिकाणी भेट घेतली.तसेच पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच गोळवली येथील तीन कुटुंबीयांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे