GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये पोत्यात भरलेले मृत वासरू आढळल्याने खळबळ

Gramin Varta
251 Views

खेड: खेड शहरात बुधवारी सायंकाळी देवणं पुलानजीक एका पोत्यात भरलेले मृत वासरू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात एक गूढ निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सायंकाळच्या सुमारास काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पोत्यातील मृत वासरू ताब्यात घेतले आणि ते पुढील तपासणीसाठी (शवविच्छेदनासाठी) पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.

हे मृत वासरू पोत्यात भरून कोणी आणि कोणत्या उद्देशाने टाकले असावे, यामागील नेमके कारण काय असावे, याबाबतचे गूढ अद्याप कायम आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या घटनेबाबत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच या गूढ वासराच्या मृत्यूचे कारण आणि ते टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध लागेल अशी अपेक्षा आहे.

Total Visitor Counter

3369302
Share This Article