गुहागर: गुहागरवरून चिपळूणला जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला मागून धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुहागर बस स्थानकातून संध्याकाळी सहा वाजता सुटणारी चिपळूण एसटी बस पाटपन्हाळे शृंगारतळी दरम्यान गडगोबा देवस्थान जवळ वेगाने आली असता या रस्त्यावरून पायी कामावर जाणाऱ्या अजित कदम (रा. पाटपन्हाळे, वय 40) या तरुणाला मागून उडवले. धडक एवढी जोरात होती की, त्याच्या डोक्याला पायाला व हाताला मार लागला आहे. त्याला त्वरित शृंगारतळी येथील डॉ. पवार यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्रथम उपचार करून डेरवण येथे दाखल करण्यात आले. या एसटीतील काही प्रवाशांनी सांगितले की, गुहागर येथून बस सुटल्यापासूनच चालक नलावडे अतिवेगाने गाडी चालवत होता त्यामुळेच हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या अपघाताने पाटपन्हाळे, शृंगारतळी येथील नागरिक डॉ. पवार यांच्या रुग्णालयाजवळ जमले होते. यावेळी हा चालक नलावडे उद्धटपणे बोलत होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गंभीर जखमी झालेला तरुण हा जवळच्या आईस फॅक्टरी येथे कामाला होता. तो ड्युटीवर जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.
गुहागरमध्ये तरुणाला एसटी बसने उडवले, गंभीर जखमी

Leave a Comment