सचिन यादव / धामणी : ठाणे येथे आयोजित कोकण विभागीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची विशेष भेट घेतली. या भेटीत उत्तर मंडळातील विकासकामांचा तसेच पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अद्याप वेळ आहे, त्यामुळे महायुतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील. पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकांसाठी योग्य तयारी करणे गरजेचे असून, त्या तयारीचा फायदा महायुतीला होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विनोद म्हस्के यांनी सांगितले की, “प्रदेशाध्यक्षांसोबतच्या चर्चेत आम्ही तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, तसेच पक्षाचे काम जोमाने पुढे न्यावे,” असे चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. तिकीटवाटपाचा निर्णय मात्र वरीष्ठ पातळीवर होईल, असेही म्हस्के यांनी सांगितले.
विनोद म्हस्के यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट-विकासात्मक कामांचा आढावा
