GRAMIN SEARCH BANNER

खेड : एक लाखाची टीव्हीएस बाईक लंपास; चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
59 Views

खेड: खेड तालुक्यातील साखर, बामणवाडी परिसरातून एका महागड्या मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

घराबाहेर उघड्यावर उभी केलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. विशेष म्हणजे, फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपीची ओळख पटवत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नरेश भागोजी सणस (रा. मांडवे, ता. खेड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गु.आर. क्र. ३१८/२०२५ नुसार खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती फिर्यादी दिनेश सखाराम उत्तेकर (वय ४९, व्यवसाय नोकरी, रा. साखर, बामणवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी खेड पोलिसांना दिली. उत्तेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:३० वाजल्यापासून १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी दिनेश उत्तेकर यांच्या घराबाहेर उघड्या ठिकाणी त्यांनी त्यांची एमएच ०८ बीएच १९१५ क्रमांकाची, काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल उभी केली होती.

आरोपी नरेश भागोजी सणस याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने व स्वतःच्या फायद्यासाठी ती मोटारसायकल चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मोटारसायकलची अंदाजित जुनी बाजारपेठेतील किंमत सुमारे १,००,०००/- रुपये एवढी आहे. दिनेश उत्तेकर यांनी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीची ओळख पटवली. या प्रकरणात मोटारसायकलचा आणि आरोपीचा शोध सुरू असून खेड पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

2675690
Share This Article